![]() कन्यादान - kanyaadaan | ![]() सप्तपदी saptapadi - seven steps |
---|
खालील फेसबुक पेज मी स्वतः बनवले असून यात कोणीही इच्छुक वधुवर आणि मंडळी सहभागी होऊ शकतात. कुठलेही मूल्य आकारले जात नाही.
सोमवंशी क्षत्रिय पाठारे चौकळशी वाडवळ समाज वधुवर सूची - हा ग्रुप मी ह्यासाठी सुरु करत आहे कि इथे फक्त इच्छुक वधू वर किवा त्यांचे नातेवाइक च असतील. हा क्लोज ग्रुप आहे. म्हणजे फक्त उपरोक्त लग्नाळू एस के पी समाजातील लोकच इथे असतील.
इथे तुमचे तुम्ही च असणार. एकमेकांचे फेसबुक प्रोफ़ाइल बघा आवडले तर फेसबुक वरच संपर्क करा आणि पुढचे पुढे तुमचे तुम्हीच बघा ...
कोणा मध्यस्थाची गरजच नाही... हो फक्त कुठलाही निर्णय घेताना स्थळाची नीट चौकशी करा. कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीला मी जबाबदार नाही...
खालील लिंक वर तुम्ही फेसबुक वर जॉईन करू शकता
https://www.facebook.com/groups/581912558638133/
------------------------------------------------------------------------------------------------------------
खालील माहिती श्री विनय राऊत यांनी फेसबुक वर दिली आहे. क्षात्रैक्य परिषद यांच्या योजने नुसार हे ऍप बनवण्यात आले असून खाली विनय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार इच्छुक वधुवर मंडळी हे ऍप डाऊनलोड करू शकतात.
नमस्कार
क्षात्रैक्य परिषदे तर्फे इच्छूक वधु वरांसाठी एक मोबाईल अँप कार्यान्वित करण्यात आला आहे.
हा अँप आपण आपल्या मोबाईलवर डाउनलोड केला आहे का ? नसेल तर
" kpvadhuvar@gmail. com " ह्या मेल आय डी वर आपले नाव, नोंदणी दिनांक, पावती क्रमांक कळवावे. हा मेल आम्हाला मिळताच आपल्या
मेल आयडी वर एक फॉर्म पाठवला जाईल, तो भरून आम्हास शेवटचे ऑप्शन SUBMIT केल्यावर आपला भरलेला फॉर्म आम्हाला पोहचेल.
त्यानंतर आपणास Lonar हि link व त्याबरोबर आयडी, पासवर्ड पाठवण्यात येईल. लिंक आपल्या मोबाईलवर डाउनलोड करावी आणि
आय डी,पासवर्ड टाकावा आणि त्यानंतर मुलांना मुलींची तर मुलींना मुलांची माहिती मिळेल.
आपणास याबाबत काही शंका असेल तर मला किंवा जगदीश पाटील 9821548919 या क्रमांकावर संपर्क करावा.
विनय राऊत 9823351947
प्रमुख कार्यवाह - क्षात्रैक्य परिषद
टिप : अँप डाउनलोड केलेल्यांनी काही अडचण किंवा सुचना असल्यास कळवावे तसेच हा मॅसेज नवीन सभासद होण्याकरिता हि आहे, आपण
आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहचवावा , हि विनंती
विनय राऊत 9823351947प्रमुख कार्यवाह - क्षात्रैक्य परिषद
------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्ही चौकळशी लग्न समारंभामध्ये ब्राह्मण / पुरोहित याना पाचारण करतात. हे शके 1124 ला राणा बिंबदेव यांनी दिलेल्या आदेशानुसारच. ब्राह्मणाच्या पौरोहित्यानुसारच लग्न समारंभ सुरु होतो.
पूर्वी लग्नात वरराजा (नवरा मुलगा) लाकडाच्या सिंहासनावर बसवला जाई. सिहासनाची लांबीरुंदी 3.5 फूट क्स 3.5 फूट असे. सिहासनाच्या चारही बाजूनी कोपऱ्यात 4 कलश / 4 हिरवे नारळ (शहाळी ) / 4 केळीचे छोटे खांब लावले जात.
वरराजा (नवरा मुलगा) च्या बाजूला केळीच्या खोडाचा 3 फूट उंचीचा खांब आडवा ठेवण्यात येई, त्यात केळींच्याच खोडापासून बनवलेला नारळ ठेवून त्याला पाचवा कलश म्हणून पुजण्यात येई.
ह्या पाचव्या कलशावर सहा कामट्या ठेवल्या जात.
ह्या 6 कामट्या म्हणजे 6 प्रतीके होत - सोमवंशी ची 6 आडनावे / 6 गावे / 6 मुख ब्रह्मचारी देव कार्तिकेय ची ) ह्या सिहासनावर घुमट बसवला जाई आणि त्यात वर राजा ला बसवून नावळ (वरात) काढण्यात येई.
सोपाऱ्याचे सोमवंशी पंच छत्र घेत.
नवर देव राणा बिंबदेवानी दिलेला राणव पट्टा घालत असे.
हातात वीर कंकण आणि पायात तोडर घालत असे.
मुलगी दागिन्यांनी सजलेली असे. पुतळा हार, लहान शिराण, वज्रटीक , डोळे, पाशी हार , केतकी हार, गुलाब फुले, ठुशी, कंठी , कोट , दुलडी, बोरमाळ , चुडे, नवले, दंड कडे (बाजूबंद ), वाळा ,गोफ, तोडा असे सजलेली नवरी बैल गाडीत बसून लग्न मंडपात येत असे. लग्न नंतर वर राजा तिला मंगळसूत्र , हिरव्या बांगड्या, कुंकुम, नथ अशी सौभाग्य अलंकार देत असे. पूर्वापार पासून मंगळसूत्र म्हणजे सोन्याचा गोफ /हळदी धागा ज्यात पंथी आणि पाचू आणि माणिक मढवलेले असे. कालांतराने जेवा शूर्पारक हे मुस्लिम आणि त्यानंतर पोर्तुगीजांनी काबीज केले तेव्हा अशा सिहासनाचा वापर करणे अर्थहीन वाटल्याने त्याचा वापर बंद करण्यात आला. कारण त्यांना स्वतःचीच शरम वाटू लागली होती कि आपण आपलाच प्रदेश परकीयांच्या आक्रमणांपासून वाचवू शकलो नाहीत.
