top of page

आमचे देव देवता - एक अभ्यास

  • भूमिका म्हात्रे Bhumika
  • Sep 6, 2017
  • 5 min read

नमस्ते !

मी भूमिका म्हात्रे. एक मराठी मुलगी. आज अत्यन्त क्लेशदायक वाचनात आले आपल्या देव देवता बद्दल समाजात किती गोंधळाचे वातावरण आहे हे कळले. हिन्दू देवी देवतांकडून अभक्ष भक्षण करणे बाबत जी मत मतांतरे चालू आहेत त्याबद्दल माझाही खारीचा वाटा.

मी सध्या सिडनी ऑस्ट्रेलिया ला वास्तव्यास आहे आणि कालपासून एम एल अ ऑस्ट्रेलिया ह्या लाम्ब मीट कंपनी च्या ऍड वरून गदारोळ माजलेला आहे. ह्या ऍड मध्ये आपले आराध्य गणपती बाप्पा ना नॉन व्हेज जेवण दारू पिणे आणि स्वतःसाठी मार्केटिंग शोधणे इत्यादी आक्षेपार्ह गोष्टी दखवण्यात आलेल्या आहेत.

सर्वच ह्या गोष्टीला विरोध करत आहेत हि जमेची बाजू आहे. पण काही लोक मात्र इट्स ओके. काय फरक पडतोय. काही ठिकाणी दखवतात गणपती गौरी ला दारू आणि मटण चिकन चा नैवेद्य असे म्हणत आहेत. बऱ्याच वर्तमान पात्रात देखील हे लिहून आलेय.

प्रथम राग आला कि असे कसे कोणी म्हणून शकते... मग वाचले... तटस्थपणे वाचले. आणि मग माझ्या स्वतःच्या वाचनामुळे जे माहित आहे आणि जितके माझे जुजबी ज्ञान आहे तेणेकरून स्वतःचे म्हणणे मांडणे मला योग्य वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.

मी वाचलंय तो आदिशिव आदिब्रह्म आदिविष्णू एकच असा आहे जो वेदांना जाणतो. ऋषींच्या चिंतनातून वेद प्रकटले. गायत्रीने शेकडो ऋषींच्या मनात ते ज्ञान प्रकट केलं. ऋषींनीं ते सर्व ज्ञान मानवांना वापरण्यासाठी दिल. ज्ञान हे तीन पातळीवर आवश्यक असते. बुद्धी - बुद्धीने ज्ञान जमा करतो. मन - ज्ञान झालं तरी ते पटलं पाहिजे, मनाला त्याची आवड लागण आवश्यक असतं. भारतीय संस्कृतीने सगळ्या गोष्टी साधेपणाने, अत्यंत सुंदरपणे मांडल्या आहेत.

पार्वती-कश्यप संवाद ह्याच नीट वाचन करा. मानवजातीचा खरा इतिहास ह्या पार्वती-कश्यप संवादामध्ये सांगितला आहे. हा इतिहास उघडपणे लिहिला जाणार नाही ह्याची काळजी घेतली गेली होती. कारण त्यामुळे मानव शहाणा झाला असता. मानवाला शहाणं करण्याच्या नावाखाली अज्ञानी ठेवलं गेल. खर्‍या ज्ञानापासून वंचित ठेवलं गेलं, मानवाचा खूप मोठा इतिहास आहे. ग्रीक, इजिप्त लोकांनी, अफ्रिकेतील काही टोळ्यांनी सुद्धा हा इतिहास लोककथांच्या, दैवत कथांच्या माध्यमातून जतन करून ठेवलाय.

साधा सरळ हिशोब आहे जे निर्गुण निराकार सगुण साकार आपल्या बुद्धीच्या आवाक्यात नाही ज्या परम तत्वाने आपल्याला बनवलाय ते किती उच्च दर्जाचे दिव्या तेज असेल... ते खरंच का तुमच्या माझ्या सारखे भौतिक अन्न खात असतील? शक्ती च्या दर्जाच्या... आजच्या जमान्याच्या भाषेत बोलायचे तर एनर्जी च्या लेवल वर असते हे सर्व तत्व ... ह्या एनर्जी लेवल ला खरंच कोणी दारू मटण चिकन खात असेल?? ते परम शिव आदितत्व आहे आदी शक्ती आहे ...त्यांचे अन्न वेगळे... परमेश्वर प्रेमाचा भुकेला असतो... आपल्या बाळांनी सुखात असावे आणि त्याने ह्या जन्माचा उत्कटपणे उपभोग घ्यावा हीच त्या आई जगदंबा ची इच्छा असते. ते भाव विभोर श्रद्धेचे विश्व आहे.

त्यामुळे कोणत्याही सुज्ञ व्यक्तीने नीट विचार केला तर कळेल कि हि सर्व मानव निर्मित अशुद्धता आहे जी आज च्या काळात विविध अशुभ रूढी आणि समजुती च्या रूपात दिसून येत आहेत. गणपती ला गौरी ला दारू मटण चिकन दखवणे हे त्यातलेच एक.

आज च्या काळात हिंदू दिन्दुत्व याबद्दल फारसे कुणाला माहित नाही. जे काही आहे ते चालू देतोय. फार कमी लोके आहेत ज्यांनी खरोखरच अभ्यास केलाय. हिंदू देव देवता त्यांच्या काळातले ते आहार विहार ह्यांचे संदर्भ फारसे तपासले गेले नाहीत किंवा त्याबद्दल चर्चा झाली नाही. इथे मी मला जितके माहित आहे ते देण्याचा प्रयत्न करतेय. ह्या मानवी इतिहासाच्या मोठ्या कालखंडात खूप वाईट गोष्टी देखील घडलाय हे आपण इतिहासातून डोकावून पाहतोय. भारतावर बरेच परकीय आक्रमण झाली आणि इतर धर्म लादले गेले. कधी दमदाटीने बळजबरीने तर कधी बुद्धिभेद करून धर्मातराने तर कधी अज्ञानामुळे. पिढ्यानु पिढ्या हिंदू देव देवता ह्यांच्या बद्दल बरेच अपसमज पसरवले गेले. भलत्याच गोष्टी धर्माच्या नावाखाली घुसडण्यात आल्या. सोमरस पिणे भोजन नैवेद्य भक्षण करणे इत्यादी गोष्टींमध्ये हि जाणून बुजून नाही नाही त्या गोष्टी घुसडण्यात आल्या जसे कि अभक्ष्य भक्षण करणे आणि सोमरस म्हणजे दारू पिणे हे देवांशी जोडले गेले.

लोक जनमानसात एकदा एखादी गोष्ट रुजली कि पिढ्यानु पिढ्या त्याचे बिनडोक पणे अनुकरण केले जाते हि भारतीयांची जुनी नस ह्या नतद्रष्ट लोकांनी बरोबर ओळखली होती आणि तिथेच त्यांचे फावले. त्यामुळे देवतांचे शुचित्व आणि सात्विकत्व लोप पावले. नाक्या नाक्यावर असंख्य देव देवता निर्माण करून त्यांचा बागुलबुवा जनमानसावर लादला गेला. त्यात दारूचा नैवेद्य मांसाहार

मटण

मासे कोंबड्या बळी देऊन ते नैवेद्य दाखवणे आणि खाणे हे असले प्रकार अनुकरण केले गेले जे आज पावेतो चालू आहेत.

हिंदू समाजाचे असंघटित पण ... हे ह्याचे मुख्य कारण आहे. संघटित पणा नसल्याने काय योग्य... काय अयोग्य ... ह्याचा सर्वत्र सावळा गोंधळ चालू आहे. आणि त्यामुळेच आज संपूर्ण हिंदू समाजात गोंधळाचे वातावरण आहे.

म्हणून म्हटले इंटरनेट वर हे लिहून ठेवावे. कोणी वाचलच तर त्यांना कदाचित थोडेफार कळेल. पुढे माझीही पिढी मोठी होईल आणि हे वाचेल आणि थोडातरी गोंधळ कमी होईल इतकाच हेतू सफल झाला तरी पुरे.

भूमिका मयूर म्हात्रे

---------------------------------

हिंदू देव देवता अग्रक्रम

हिंदू धर्माप्रमाणे परमेश्वर निर्गुण निराकार आहे. तो सर्वत्र आहे. सर्व विश्व त्यात सामावलेले आहे. ह्या निर्गुण निराकारातून सगुण साकार रूप निर्माण होते आणि ते मुख्य म्हणजे त्रिदेव आणि त्रिशक्ती.

हिंदू धर्मातील मुख्य त्रिदेव तीन देव देवता खालील प्रमाणे :

- महेश ( लय कर्ता / शून्य अवस्था / निर्गुण अवस्था ) -> शक्ती स्वरूप -> पार्वती ( देवी सती / काली / दुर्गा माता ) - > कार्तिकेय आणि गणपती (गणेश) हे ह्यांचे दोन सुपुत्र . पैकी गणेश हे विद्येचे दैवत आणि कार्तिकेय हे देवांचे सेनापती.

- ब्रह्मा ( श्रुष्टि चा निर्माता) -> शक्ती स्वरूप -> सरस्वती (ब्रह्माणी )

- विष्णू ( पालनकर्ता ) -> शक्ती स्वरूप -> लक्ष्मी

ह्या मुख्य देवता (अधिदेवता ) आणि बाकीचे ३३ कोटी देव.

हे सर्व त्या एकाच निर्गुण निराकाराची सगुण साकार व्यक्त रूपे आहे ...

( आजच्या काळातले उदाहरण द्यायचे तर म्हणजे कसे ... कॉम्प्युटर एकाच असतो पण त्या एकाच कॉम्प्युटर वर अनेक वेग वेगळे प्रोग्रॅम्स मुळे वेगवेगळी संपूर्ण भिन्न प्रकारची कामे / कार्ये होत असतात आपली...म्हणजे निर्गुण निराकार कॉम्प्युटर आहे आणि त्याची सगुण साकार कामे होतात तेव्हा आपल्याला ती दिसतात तसेच काहीसे... कॉम्प्युटर चा डिवाइस दाखवता येतो पण आत जे काम होत असते इतर मशीन्स मुळे ते काम दखवत येत नाही ..ते फक्त झाल्यावर आपल्याला दिसते आणि आपण ते अनुभवतो तसेच हे आहे... निर्गुण निराकार देव दिसत नसला तरी टायच्या सगुण साकार रूपातली कार्ये चालूच असतात आणि म्हणूनच ह्या विषाचा व्यापक प्रचंड कारभार हि सुरळीत चालू असतो ज्याला आपण निसर्ग म्हणतो. )

हिंदूंचे 33 कोटी देव आहेत असे का म्हटले जाते? ते खरेच संख्येने 33 कोटी आहेत का? - या संदर्भात वाचनात आलेली ही माहिती :-

३३ कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे हे मी एक संस्कृत अभ्यासक म्हणून ठामपणे सांगते. येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो "प्रकार". हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रश्न असा येईल कि हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देव नेमके कोण? तर त्यांची नावे देतेय. धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६) धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८) हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२) आणि याखेरीज २ अश्विनीकुमार! असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात.

Comments


© 2016-2025 by मी चौंकळशी वाडवळ. Proudly created by भूमिका मयूर म्हात्रे (Bhumika Mayur Mhatre)

bottom of page