वाडवळ मटण / चिकन कृती Vaadval Mutton / Chicken recipe
- भूमिका म्हात्रे Bhumika
- Nov 18, 2016
- 2 min read
मटण/ चिकन म्हणजे आमचा आवडतं अन्न. आठवड्यातून एकदा तरी शुक्रवारी किंवा रविवारी मटण/चिकन असतेच आमच्याकडे. मम्मी 'पपा इतके साग्र संगीत जेवण बनवायचे कि तुम्ही नाही म्हणूच शकत नाहीत.
तर हि खास माझया मम्मी 'पपा च्या हाताची मटण / चिकन रस्सा रेसिपी पद्धत.
वाटण :
एक किलो मटण असेल तर तीन मोठे कांदे बारीक चिरून, सुके खोबरे पाव वाटी , 7/8 काळीमिरी, 1 दालचिनी तुकडा, एक जावेत्री छोटीशी, 1 दगडफूल, 15/20 दाणे धनिया (धना ) , लाल बेडग्या मिरच्या सुक्या 2 ( याने रंग येतो छान लाल आणि ह्या तिखट नसतात ) शहाजिरे थोडेसे हे सर्व छान लालसर भाजून घ्यावे आणि वाटण वाटून घ्यावे. ( काही लोके यात खसखस पण टाकतात पण ती गरम पडते म्हणून मम्मी 'पपा नाही टाकायचे )
रेसिपी:
एक चिरलेला कांदा , 4 लसूण पाकळ्या आणि एक इंचाचा आले तुकडा ग्रेटर वर खिसुन 2 पळी तेलात टाकावं आणि परतून घ्यावे. त्यात अर्धा चमचा हळद टाकावी. मग थोडे मीठ टाकून कांदा मी मऊ तळला /शिजला कि त्यात मटणाचे / चिकनचे आणि बटाट्याचे तुकडे टाकावेत. थोडेसे परतावे.
मग त्यात चार चहाचे चमचे "वाडवळ मसाला" टाकावा. ( वाडवळ लाल मिक्स मसाला - ह्याची ह्या विभागात रेसिपी दिलेली आहे)
हे सर्व नीट परतून घेऊन त्यावर झाकण लावावे. झाकणात पाणी ठेवावे.
दहा मिनिट्स नंतर झाकण उघडून पुन्हा सर्व एकत्र करून घ्यावे आणि छान वास सुटलेला असतो ठेवा त्यात वरील वाटण टाकावे.
नीट ढवळून घेऊन त्यावर पुन्हा झाकण ठेवून त्यात पाणी ठेवावे. पाच मिनिट्स वाफ आली कि झाकणावरील पाणी आत टाकावे आणि पेलाभर पाणी टाकावे.
रस्सा किती जाडा पातळ हवा त्या प्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकावे.
मग पुन्हा झाकण ठेवून त्यात पाणी टाकून निदान 20 मिनिट्स किंवा मटण/ चिकन , बटाटा शिजेपर्यंत शिजवावे.
झाले कि वरून मूठभर कोथिंबीर टाकावी.
हा रस्सा एकदम भन्नाट लागतो भाकरी / ब्रेड / भात / चपाती कशाहीबरोबर.

Comments